ग्राम पंचायत कळमना यांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा

ग्राम पंचायत कळमना येथील नागरिकांना त्यांना त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या शुद्ध हेतूने गावात शुद्ध आर ओ फिल्टर्ड पाणी पुरविल्या जाते,तसेच गावकऱ्यांना सकाळी एकदा अंघोळीसाठी गरम पाणी आणि पिण्याचे शुद्ध पाणी नळाद्वारे पुरविल्या जाते.
हि व्यवस्था कोल इंडिया लिमिटेड(WCL)च्या वतीने गावकऱ्यांकडून कार्यान्वित केली गेली आहे .

ग्राम पंचायत कळमना येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची उत्तम व्यवस्था गावात केलेली आहे , नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवतात आणि ग्राम पंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या घंटागाडीद्वारे संकलित केला जातो .

ग्राम पंचायत कळमना येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात व्यायामाचे महत्व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी पटवून दिल्यामुळे गावात सुसज्ज अशी व्यायामशाळा उभी राहिली आहे .

ग्राम पंचायत कळमना यांनी अबाल वृद्ध नागरिकां फावल्या वेळेत बसण्यासाठी रस्त्याच्या कडेला जागोजागी अशा प्रकारचे बसण्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्या ठिकाणाला विसावा असे सुंदर नाव देण्यात आले आहे .

ग्राम पंचायत कळमना यांनी उभारलेली ही आहे स्मशानभूमीतील विसाव्याची इमारत.वास्तविकता हि स्मशानभूमी असली तरी गावकऱ्यांना निसर्गातला ऑक्सिजन येथे मिळण्याचे हे ठिकाण आहे. गावात उन्हाळ्यात , पावसाळ्यात जेंव्हा मृत्यू होतात तेंव्हा गावातील नागरिकांना,मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना हा आडोसा खूप महत्वाचा ठरतो .

स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्राम पंचायत कळमना यांनी नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी रस्त्याच्या कडेला जागोजागी अशा प्रकारचे थुंकण्यासाठी,हात धुण्यासाठी वाश बेसिन बसविण्यात आले आहेत .

ग्राम पंचायत कळमना अंतर्गत नागरिकांच्या व गावच्या सुरक्षेसाठी गावात 9 CCTV कॅमेरे लावण्यात आले आहे त्याचे Live Telecast राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात करण्यात आले आहे

आदर्श स्मार्ट गाव कळमना येथील बालोद्यान पार्क

सोलर ड्युअल पंप बसवून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे

पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत

ऑक्सिजन पार्क येथे ठिबक सिंचनाद्वारे पाणी वुक्षाना देण्यात येत आहेत

आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमना येथे व्यसन मुक्ती व प्लास्टिक बंदी चा ठराव मंजूर करून दंड आकारला जातो .

जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था.

रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व पेव्हर ब्लॉक लाऊन सुंदरीकरण करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा कळमना येथे शाळेतील मुलांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे

कलेला वाव देण्यासाठी सुसज्ज असा रंगमंच उभारण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शाळा कळमना शाळेच्या मागे आणि नाल्या शेजारी अशी सुंदर चौपाटी बांधण्यात आली आहे.

डॉ . बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कळमण्याची सुसज्ज इमारत .

नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी बंदिस्त जिम उभारण्यात आले आहे.

नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी ओपन जिम उभारण्यात आले आहे.

ग्रामपंचायत कळमना अंतर्गत येत असलेल्या निंबाळा गावची सुंदर अंगणवाडी .

ग्रामपंचायत कळमना अंतर्गत येत असलेली जि .प . प्राथमिक शाळा निंबाळाची शाळा, ज्या शाळेने १ ० ० % सोलर ऊर्जेचा वापर केलेला आहे .
