आमच्या गावाविषयी ...........

आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमना अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कळमना
शिक्षक वृंद
- श्री. सुधाकर पांडुरंग लोहे – मुख्याध्यापक
- श्री. दिलीप रामदास निमकर – विषय शिक्षक
- श्री . विलास मारोती गिरसावळे – विषय शिक्षक
- श्री . शालिक भिवसन पेंदोर – विषय शिक्षक
शाळा व्यवस्थापन समिती
- श्री. प्रशांत उद्धव ताजने – अध्यक्ष
- सौ . प्रियंका संतोष बलकी – उपाध्यक्ष
- श्री . ज्ञानेश्वर वांढरे – सदस्य
- श्री . छत्रपती गेडाम – सदस्य
- श्री . राहुल बल्की – सदस्य
- सौ . नाजुका प्रदीप आत्राम -सदस्या
- सौ . जोत्स्ना विनोद सिडाम – सदस्या
- सौ . सुनीता राजू भोयर – सदस्या
- सौ . सुनीता ऋषी उमाटे – सदस्या
- श्री . कवडू पा . गौरकार – सदस्य
- श्री . सुधाकर पांडुरंग लोहे – सचिव
- श्री . विलास मारोती गिरसावळे – वि . प्रतिनिधी
- कु . सोनल संतोष पाल – वि . प्रतिनिधी
- कु . श्रेयश श्रीकांत वाढई – वि . प्रतिनिधी

आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमना संचालित डॉ . बाबासाहेब आंबेडकर वाचनालय.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर वाचनालय समिती.
- श्री. कवडू जनार्धन गौरकार – अध्यक्ष
- श्री . भूषण महादेव ताजने – उपाध्यक्ष
- श्री . लक्ष्मीकांत रामकिसन दिवसे – सदस्य
- श्री . अमित मारोती बल्की – सदस्य
- सौ . समीक्षा सचिन वीरूटकर -सदस्या
- सौ . सुनिता शंकर धांडे – सदस्या
- सौ . सोनाली संजय पिंगे – सदस्या

आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमना संचालित पाणी पुरवठा योजना.
ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती.
- श्री.नंदकिशोर सुभाष वाढई – अध्यक्ष
- श्री . निलेश प्रभाकर वाढई – उपाध्यक्ष
- श्री . महादेव गोविंदा ताजने – सदस्य
- श्री . रामचंद्र जनार्धन गौरकार – सदस्य
- सौ . स्नेहा विकास आस्वले – सदस्या
- सौ . कौशल्या मनोहर कावडे – सदस्या
- सौ . रंजना दिवाकर पिंगे – सदस्या
- सौ . प्रियांका मनोज गेडाम – सदस्या
- श्री . रमेश दादाजी आत्राम – सदस्य
- सौ . कल्पना दिवाकर क्षीरसागर – सदस्या
- सौ . छाया कवडू गौरकार – सदस्या
- सौ . लता बबन क्षीरसागर – सदस्या
- श्री . एस . एस . मरापे -सचिव
सरपंचाच्या लेखणीतून . ..........
सरपंच झाल्या नंतर सरपंचानी सर्वप्रथम मी सरपंच झालो हा अभिमान (ego) सोडला पाहिजे.सरपंच झाल्या नंतर सरपंच यांनी संपूर्ण गावचा सरपंच व्हावा. गावामध्ये त्यांना सहकार्य केलेल्यांना आणि ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये. जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे. स्वतःमध्ये अंतर ठेवून बदल करावा. स्वतः सरपंचाने जनतेमध्ये मिसळून गावाची भौगोलिक परिस्थिती समजून उमजून वागावे. त्यामुळे सरपंचाबद्दलचे विचार बदल त्यांच्यामध्ये घडून येतील.
सरपंचांनी राजकीय पुढाऱ्यांची चापलूसी करू नये. सरपंचांनी जास्तीत राजकीय हेतूने काम करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा आदर्श गाव होण्यास अडथडे येतात.
सर्वधर्म समभाव ही संकल्पना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या शेतकऱ्याला अर्पण केलेल्या महान ग्रंथा प्रमाणे कृतीत आणावी.
पंचायत राज व्यवस्थेमधील तीन नंबरची व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे. आणि त्या गावाचा प्रमुख सरपंच हा प्रमुख ठरतो.
सरपंच म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय कुठला अधिकारी खोडू शकत नाही याचा अर्थ त्याने आपल्या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ग्रामसेवकाबद्दल तक्रार करायची असते का? ग्रामसेवक सरपंचांना काम करु देत नाही वैगेरे निरर्थक गोष्टी असतात. उलट सरपंचांनी ग्राम सेवकांच्या पुढे जाऊन काम केले पाहिजे कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुमचे म्हणणे हे लोकशाही पध्दतीने मांडले तर ते ग्रामसेवकांना मान्य करावे लागते, सरपंचाची दुसरी प्रतीमा अशी झाली आहे सरपंच हा ग्रामपंचायतमध्ये खुप मोठा भष्टाचार करतो परंतु जनतेला तुम्ही या सर्व बाबी पटऊन दिल्या आणि कामाद्वारे कृतीतून दाखऊन दिले तर जनता सुध्दा तुमच ऐकेल, परंतु जनतेला तुम्ही गृहीत धरत नसाल, तुम्ही जनतेला हे नका करू म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या सोयीनुसार सुख सोयी उपलब्ध करून द्या, उदाहरणार्थ गाव खेड्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यांना साहित्य ठेवण्यासाठी जागा नसते म्हणून त्यांना नाईलाजाने रस्त्यावर सगळे साहित्य ठेवाव लागते परंतु तुम्ही जर व्यवस्था करुन दिली तर जनता निश्चितच ऐकेल, सरपंचांनी सरपंच म्हणून काम असताना स्वतःच स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे शक्यतो त्यांनी आपल्या घराजवळ विकास काम करु नये व स्वताच्या नातलगांना कुठलीही शासकीय योजनेचा शक्यतो लाभ देण्यात नये हे सगळं तुम्ही स्वतःच्या घरापासून प्रत्यक्षात कृती करा निश्चितच जनता तुमची दखल घेईल व गावातील जनता तुमचं अनुकरण करेल, एक मी माझे उदाहरण सांगतो आहे माझा गावाला मुक्काम असला की माझी आई मला सकाळी उठल्यावर तोंड धुण्यासाठी ब्रश आणुन देते मी सुद्धा कधीच टाळत नाही सांगायचं तात्पर्य एकच की आईचं आणि मुलाचं असे नातें असले पाहिजे जेणेकरून समाजामध्ये ममता, प्रेम बंधुता निर्माण होईल.
आपल गाव आदर्श करण्याचा ठरवल तर तुम्ही आपल स्वच्छ, सुंदर निर्मळ व पर्यावरण पुरक आदर्श स्मार्ट गाव करु शकता, माझं गाव सुध्दा अजिबात भौगोलिकदृष्ट्या चांगलं नव्हतं परंतु मी स्वतः वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अनुयायी कार्यकर्ता आहे, स्वतः व्यसन मुक्त आहे व माझा आध्यात्मिक कुटुंबात जन्म झाला त्यामुळे मी सामाजिक बांधिलकी लहानपणापासून बघीतली आहे आणि ती जपण्याचा सुध्दा प्रयत्न करीत आहे. मी सरपंच झाल्यानंतर सर्वात प्रथम गावात स्वच्छता अभियान राबविण्यात सुरुवात केली, सर्व गाव स्वच्छ केले अडगडीत पडलेल्या घंटा गाड्या सुरू केल्या, गावातील ओला व सुका कचरा उचलुन आम्ही गाव स्वच्छ सुंदर निर्मळ ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, त्यानंतर दुसर महत्वाचे काम केले असेल तर ते म्हणजे गावातील विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानार्जन व्हावं यासाठी दुर्लक्षित असलेली शाळा शैक्षणिक सामाजिकद्रुष्ट्या चांगली व्यवस्थित केली, आता कान्व्हेंटला सुध्दा लाजवेल एवढी चांगली शाळा तयार झाली आहे .
तिसरी बाब कुठली केली असेल तर ती म्हणजे झाडे लावण्याचा जागतिक कार्यक्रम राबविण्यात आला, गावांमध्ये जास्तीत जास्त वुक्ष लागवड केली त्यामध्ये चिकु फणस नारळ लिबु, आवळा,आबा, विविध फुलांची,शोभेची झाडे लावली त्यांच्या गाव हिरवगार, पर्यावरण पुरक प्रदुषण मुक्त केले माझ्या गावाला जी स्मशानभूमीची जागा अत्यंत खराब होती आज त्या जागेवर सुंदर ऑक्सिजन मार्डन पार्क व बालोद्यान डोलाने उभे आहे व गावातील दुतर्फा, विखुरलेल्या जागेवर फळ व फुलांचे वुक्ष लागवड केली त्या मुळे भविष्यात ग्रामपंचायत चे उत्पादन वाढुन आर्थिक विकास साधला आहे,

श्री.नंदकिशोर सुभाष वाढई
सरपंच आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमना, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर
संपर्क +919011758026, +919923719793